Tue. Dec 7th, 2021

EX-Boyfriend कडून मुलीच्या प्रियकराची हत्या, मृतदेहाची अघोरी पूजा!

त्रिकोणी प्रेमातून तरुणीच्या EX-Boyfriend ने हातोड्याने डोके ठेचून तरुणाची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे त्यानंतर मृतदेहाची अघोरी पूजाही करण्यात आली.  ही थरारक घटना रविवारी सायंकाळी नागपूरच्या संत गाडगेबाबानगर भागात रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली राहुल तुरकेल असे मृताचे नाव असून रितेश सिकरवार असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

काय घडलं नेमकं?

रितेश हा ‘सातपुडा बार’मध्ये वेटर आहे.

तर राहुल हा महापालिकेत स्वच्छता कर्मचारी होता.

रितेश हा राहुलचा आत्येभाऊ आहे.

रितेश याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

कालांतराने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.

याचदरम्यान तरुणीचे राहुलसोबत प्रेमसंबंध जुळले.

त्यामुळे  रितेश हा संतापला होता.

रविवारी रितेश राहुलला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याला दारू पाजली.

दरम्यान मैत्रिणीचा  विषय निघाला.

दोघांमध्ये वाद झाला.

वाद विकोपाला गेला.

संतप्त रितेशने राहुलच्या डोक्यात हातोड्याने वार करून हत्या केली.

हत्येनंतर रितेश घरातून पसार झाला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तपास करत आरोपीला अटक केली …

 

घटनास्थळी अघोरी पूजा?

रितेशने राहुलला ठार मारल्यानंतर रितेशने मृतदेहाची अघोरी पूजा केली.

मृतकाच्या कपाळाला कुंकू लावले.

अगरबत्ती पेटवली.

बुंदीच्या लाडूचा नैवेद्य चढवला.

लिंबाने ओवाळणी करून नैवेद्य मृतदेहाजवळ ठेवला.

घराला कुलूप लावून रितेश पसार झाला.

घटनास्थळावर पोलिसांना पूजेचे ताट, बुंदीचे लाडू व अगरबत्तीची राख आढळली.

त्यामुळे  हत्येनंतर अघोरी पूजा केल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

राहुलच्या आईला मानसिक धक्का

मृतक राहुलला वडील नाहीत.

वडिलांचा मृत्यूनंतर त्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती.

राहुलनं दोन बहिणींचं लग्न करून त्यांचं कुटुंब सावरलं होतं.

आता त्याच्याही लग्नासाठी स्थळ पाहणं सुरू होतं.

तो विधवा आईचा एकमात्र आधार होता.

मात्र, त्याची हत्या झाल्यानं त्याच्या आईला जबर मानसिक धक्का बसलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *