माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने मानले विद्यमान उपमुख्यमंत्र्याचे आभार

मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच नाव देण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटद्वारे दिली.
यानंतर आता अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख याने अजित पवारांचे आभार मानले आहेत.
रितेश देशमुखने ट्विट करुन आभार मानले आहेत.
रितेश देशमुखने अजित पवारांचे ट्विट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.
तुम्ही विलासराव देशमुखांनी केलेल्या कामाला मान दिला, त्या बद्दल मी मुलगा म्हणून तुमचा सदैव आभारी राहेन, असं ट्विट रितेश देशमुखने केलं आहे.
दरम्यान अजित पवारांनी मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुखांच नाव देण्या संदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या आहेत.
तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली.
यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.