Thu. Jan 27th, 2022

सेना- भाजपाच्या युतीवर नारायण राणे यांची टीका

भाजप- सेनेची युती म्हणजे ‘तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना’ अशी गत झाली असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी नारायण राणे यांनी सेना- भाजपाच्या युतीवर घणाघाती टीका केली. मुंबई महानगरपालिकेत जास्त भ्रष्टाचार झाला. तसेच तो पचवता यावा, यासाठी भाजपाबरोबर युती केली असल्याचा आरोप नारायण राणे यांनी लावला आहे.

नारायण राणे यांची युतीबाबत टीका –

ही युती जनतेसाठी नसून व्ययक्तीक स्वार्थासाठी आहे.

युती होणार हे मला माहिती होते.

युतीचा फायदा दोन्ही पक्षाला होणार नाही असे नारायण राणे म्हणाले.

युती झाली तरी मन जुळलेली नाही.

उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. कार्यकर्त्यांना कामालाही लागण्याचे आवाहन केले होते.

मात्र भाजपसोबत युती झाल्यामुळे उमेदवारांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला.

स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांची फजिती झाली आहे.

तसेच मुंबईतचा मराठी माणसाचा टक्का घसरण्याचे कारणही शिवसेनाच असल्याचा आरोप नारायण राणे यांनी लावला आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *