Mon. Dec 6th, 2021

माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. यशपाल शर्मा यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यशपाल शर्मा हे १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते.

१९८३च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाने सुरुवात केली होती. यामध्ये शर्मा यांची भूमिका महत्त्वाची होती. इंग्लंडविरुद्ध कठीण परिस्थितीत ६१ धावा केल्या. या स्पर्धेत शर्मा यांनी ३४.२८ च्या सरासरीने २४० धावा केल्या.

यशपाल शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून ३७ कसोटीत ३३.४५च्या सरासरीने १ हजार ६०६ धावा केल्या. १४० ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. तर एक दिवसीय ४२ सामन्यात त्यांनी देशाचे प्रतिनिधत्व केले. या एक दिवसीय सामन्यात शर्मा यांनी २८.४८ च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *