Sat. Aug 13th, 2022

अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसऱ्यांदा समन्स

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसरा समन्स पाठवण्यात आला आहे. ५ जुलै रोजी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पूर्वीच्या समन्समध्ये देण्यात आले होते. अनिल देशमुख यांनी यापूर्वी पाठवण्यात आलेल्या समन्सना आपल्या वकीलामार्फत उत्तर दिले आहे.

दरम्यान अनिल देशमुख यांनी आपण ईडीला सहकार्य करत असल्याचं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
‘ईडीने मला कागदपत्रांसहित उपस्थित रहावे असे दोन समन्स पाठविले आहे. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला ‘ECIR’ ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठविता येईल. त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या दोन्ही पत्रांत केला आहे. मी ईडीला यापूर्वीही सहकार्य केले आहे आणि यापुढेही असेच सहकार्य करत राहील’,

अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी याचिका केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी अनिल देशमुख यांचे वकील अमित देसाई यानी युक्तिवाद केला. मात्र, त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे देशमुख यांच्या याचिकेवर ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.