Tue. Aug 3rd, 2021

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

भारतीय राजकारणातले एक वादळी व्यक्तिमत्त्व, लढवय्या नेता जॉर्ज फर्नांडिस यांचे आज निधन झाले.

वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रीय राजकारणात जॉर्ज फर्नांडिस यांचे महत्त्वाचे स्थान होतेच, पण कामगार नेता म्हणून मुंबईमध्ये त्यांनी अजोड ठसा उमटवला होता.

जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म 3 जून 1930ला कर्नाटकमध्ये झाला होता.

एका हाकेवर मुंबई बंद करण्याची ताकद असलेला नेता म्हणून जॉर्ज यांची ओळख होती.

त्यांनी आणीबाणीपूर्वी दिलेल्या रेल्वे बंदच्या घोषणेमुळे तत्कालीन काँग्रेस सरकारचं धाबं दणाणून सोडलं होतं. जॉर्ज फर्नांडिस वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलय. तसेच कोकण रेल्वेसाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने समाजवादी परिवारावर शोककळा पसरली आहे.

जॉर्ज फर्नांडिस यांची कारकीर्द

 • 1950च्या दशकात मुंबईच्या कामगार चळवळीमधला एक महत्त्वाचा चेहरा
 • कामगार नेता म्हणून देशाच्या आणि मुंबईच्या राजकारणावर अमीट ठसा
 • एका हाकेवर मुंबई बंद करण्याची ताकद असलेला नेता
 • राममनोहर लोहिया आणि प्लेसिड डिमेलो यांचा प्रभाव
 • समाजवादी कामगार संघटना चळवळीशी जोडले गेले
 • हॉटेल आणि रेस्टॉरंटमधल्या कामगारांच्या हक्कांसाठी लढा उभारला
 • 1967मध्ये मुंबईचे अनभिषिक्त सम्राट मानले जाणाऱ्या स.का. पाटील यांचा पराभव
 • 1974मध्ये रेल्वे बंदची हाक, तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात देशव्यापी निदर्शनं
 • आणीबाणीदरम्यान तुरुंगवास
 • जनता दलाच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका, त्यानंतर समता पक्षाची स्थापना
 • केंद्रामध्ये जनता सरकार आणि एनडीए सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली
 • रेल्वे, उद्योग आणि संरक्षण खात्याचे मंत्री होते
 • कोकण रेल्वेसाठी विशेष प्रयत्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *