Jaimaharashtra news

राज्यात महाशिवरात्रीचा उत्साह

देशात आज शुक्रवारी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

दरम्यान सह्याद्री पर्वताच्या कुशीतील बारा जोतिर्लिग पैकी एक भिमाशंकर या ठिकाणी रात्री कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते महाआभिषेक करुन दर्शनाला सुरुवात झाली.

भाविकांची गर्दी काल रात्रीपासुनच सुरु आहे. मंदिर परिसर सुदंर अशा फुलांच्या माळांनी सजवले आहे. संपुर्ण परिसरात भक्तीमय वातावरणात लोक शिवलिंगाची उपासना करत रांगा लावुन दर्शन घेत आहे. त्यासाठी प्रशासनाने व मंदीर व्यवस्थापनाने चोक बंदोबस्त ठेवत सुरक्षेची काळजी घेतली आहे.

भिमाशंकरला डाकिन्नम भिमाशंकरम या नावानेही ओळखलं जातं. हे अनाधी काळापासुन ते स्वयंभु असल्याची आख्यायीका सांगितली जाते. त्रेतायुगातला शिवशंकराचा भक्त आणि वरदान मिळाल्याने उन्मत्त झालेल्या त्रिपुरसुर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वर रुप धारण करुन त्रिपुरसुर राजाचा वध केला. त्यानंतर शिवशंकराचे शिवलिंग या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे.

Exit mobile version