Sun. Jun 20th, 2021

आतापर्यंत Exit Poll किती खरे, किती खोटे 

निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याचं सर्वात विश्वासार्ह माध्यम एक्झिट पोलला समजलं जातं. लोकसभा निवडणुकांसाठीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान नुकतचं पार पडलं आहे. 23 मेला कुणाचं सरकार येईल हे निश्चित होईल. तरी  निकाला आधीचं एक्झिट पोलची सर्वत्र चर्चा झाली आहे. यांमध्ये पुन्हा देशात मोदींचीच सत्ता येणार असा अंदाज वर्तवण्यात आला. या  एक्झिट पोलनंतर हा कितपत खरा ठरणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

आत्तापर्यंतचे एक्झिट पोल

लोकसभा निवडणूक- 1999
एक्झिट पोल– एनडीए मोठा विजय संपादन करणार. एनडीएला 315 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या.
प्रत्यक्ष निकाल– एनडीएला केवळ 296 जागा मिळाल्या

लोकसभा निवडणूक- 2004

एक्झिट पोल– कॉग्रेस सत्तेत परतणार नाही. भाजपला बहुमत मिळणार
प्रत्यक्ष निकाल–  एनडीएला 200 जागा देखील मिळाल्या नाही.
कॉग्रेसने सपा, बसपासोबत मिळून सरकार स्थापन केलं.

लोकसभा निवडणूक- 2009

एक्झिट पोल– युपीएला 199 तर एनडीएला 197 जागा मिळणार
प्रत्यक्ष निकाल– यूपीयेला 262 जागा, तर एनडीएला केवळ 159 जागा मिळाल्या

लोकसभा निवडणूक-2014

एक्झिट पोल– एनडीएला बहुमत मिळणार, भाजपला 291 तर एनडीए 340 जागा

प्रत्यक्ष निकाल– एनडीएला दणदणीत बहुमत मिळालं, भाजपला 282 तर एनडीएला 336 जागा मिळाल्या

लोकसभा निवडणूक-2019

एक्झिट पोल- भाजप बहुमताचा आकडा गाठणार, कॉग्रेस 100 ते 135 जागा
प्रत्यक्ष निकाल– 23 मे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *