Fri. Jun 21st, 2019

एसटी भरतीच्या अर्जांना मुदतवाढ: दिवाकर रावते

263Shares

एसटी महामंडळाच्या चालक, वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे.

यामध्ये दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्य़ांमधील उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी या मुदतवाढीची माहिती दिली आहे.

तसेच शिवशाहीच्या दरात १३ फेब्रुवारीपासून कपात करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

अशी होणार भरती प्रक्रिया

 • एसटीत वाहक,चालकांची आठ हजार 22 पदे भरणार आहेत.
 • चार हजार 416 पदे दुष्काळग्रस्त भागातून भरली जातील.
 • 15 फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
 • 24 फेब्रुवारी रोजी इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
 • महिला उमेदवारांसाठी उंचीची अट १६० सेंमीवरून १५३ सेंमी अशी शिथिल करण्यात आली आहे.
 • पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट तीन वर्षांवरून एक वर्षांवर आणली आहे.

शिवशाहीत १३ फेब्रुवारीपासून दरकपात

 • शिवशाही शयनयान (एसी, स्लीपर) सेवेचे तिकीट दर २३० ते ५०५ रुपयांनी कमी केलं आहे.
 • नवीन दरपत्रिकेनुसार ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीचा प्रवास आणखी स्वस्त होणार आहे.

शिवशाहीचे नवीन दरपत्रक

 • मुंबई-औरंगाबाद प्रवासासाठी १०८५ ऐवजी ८१० रुपये
 • मुंबई-रत्नागिरीसाठी ९५५ ऐवजी ७१५ रुपये
 • मुंबई-लातूरसाठी १२७५ ऐवजी ९५० रुपये
 • मुंबई-कोल्हापूरसाठी १०५० ऐवजी ७८५ रुपये
 • मुंबई-अक्कलकोटसाठी १२१० ऐवजी ९०५ रुपये
 • मुंबई-पंढरपूरसाठी १०२० ऐवजी ७६० रुपये
 • बोरिवली-उदगीरसाठी १४८० ऐवजी ११०५ रुपये

263Shares

Leave a Reply

%d bloggers like this: