Thu. Jan 20th, 2022

सारंगखेडा घोडे बाजारात विक्रीसाठी महागडे घोडे दाखल

नंदुरबार : सारंगखेडामधील घोडे बाजार घोड्याचा खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. महागड्या घोड्यांची खरेदी विक्री या ठिकाणी होते. या वर्षी घोडे बाजारात लाखो किमतीचे अश्व विक्रीसाठी दाखल झालेत. सारंगखेडा घोडा बाजरात 2500 हजार घोडे दाखल झाले आहेत.

या बाजरात अश्वप्रेमी महागडे घोडे पाहण्यासाठी येत असतात. सारंगखेडा घोडेबाजारात दाखल झालेल्या महागड्या घोड्यांची राजवीर आणि कल्याणी असे नाव आहे.

घोड्याची किंमत त्याच्या शरीरयष्टी आणि चाल यानुसार ठरते. किंमतीच्या बाबतीत घोड्याचा रुबाब देखील महत्वपुर्ण असतो. घोड्याच्या रुबाबनुसार त्याची किंमत ठरत असते. राजवीर घोड्याची किंमत ही 55 लाख इतकी आहे.

राजवीर घोड्याची वैशिष्ट्ये

राजवीर घोड्याची उंची इंच 67 आहे. तो पांढरा शुभ्र आहे. त्याचे डोळे निळे आहेत. तो आतापर्यंतचा घोडे बाजारातील सर्वात उंच घोडा ठरला आहे. राजवीरकडे २४ तास लक्ष दिले जाते. यासाठी 8 मजूर तैनात करण्यात आले आहेत. राजवीरच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते.

राजवीरच्या सेवेसाठी 8 मजूर असतात. राजवीरला रोज 5 लीटर दुध, 1 किलो तूप, चणाडाळ, गहू, बाजरी, कोरडा आणि सुका चारा दिला जातो. राजवीर मध्ये भुजबळ नावाचं शुभ लक्षण आहे. हे लाखो घोड्यातून एकात असते.

कल्याणी घोडी

सारंगखेडा घोडे बाजरात राजवीर नंतर कल्याणी या घोडीची चलती आहे. पवन सिंग चावला हे कल्याणी घोडीचे मालक आहेत. देशभरात झालेल्या घोड्यांच्या स्पर्धेत कल्याणी ही सलगपणे 6 वेळा विजयी झाली आहे.

कल्याणी घोडी ही मारवाड जाती आहे. कल्याणीचे चारही पाय पांढरे आहेत. कल्याणीच्या डोक्यावर पांढरा पट्टा आहे. यालाच पंचकल्याण म्हणतात. कल्याणीची उंची 66 इंच आहे. कल्याणीच्या आहारात रोज ५ लीटर दुध , १ किलो तूप, अंडी, गहू आणि चना खाद्याचा समावेश असचतो.

कल्याणीचा रुबाबदार चाल आणि अदा अनेकांना भुरळ घालते.

या निकषानुसार ठरते किंमत

घोड्यांची किंमत ही त्यांच्या उंची, रंग ,शुभ लक्षण आणि त्याचे ब्लड लाईन या निकषानुसार ठरत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *