Fri. Jun 21st, 2019

धक्कादायक! गेम खेळताना मोबाईलचा स्फोट

52Shares

नांदेड मधील जिरगा गावात गेम खेळत असताना अचानक स्फोट झाला.

यामध्ये आठ वर्षांच्या मुलाच्या हाताची पाचही बोटे तुटली आहेत.

श्रीपत जाधव या शेतकऱ्याने टि.व्ही. वरील आय कॉल के 72 या कंपनीची जाहीरात पाहून मोबाईलची ऑनलाइन मागणी केली होती.

हा मोबाईल गेल्या एक ते दिड महिन्यांपासून वापरात होता.

या मोबाईलवर त्यांचा मोठा मुलगा प्रशांत श्रीपत जाधव गेम खेळत होता.

अचानक मोबाईलचा मोठा स्फोट झाला आणि त्याच्या डाव्या हाताची पाचही बोटे त्याला गमवावी लागली.

मोबाईलचे तुकडे छातीला व पोटाला लागल्याने दुखापत झाली आहे.

बाऱ्हाळी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.

या घटनेमुळे जिरगा गावात  माेबाईल वापरणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

52Shares

Leave a Reply

%d bloggers like this: