Thu. Feb 20th, 2020

उत्तर प्रदेश विधानसभेत पीईटीएन स्फोटकं सापडल्याने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच सुरक्षेसाठी कठोर पावलं उचणाऱ्या योगी सरकारच्या सत्तेतही यूपीची सुरक्षा रामभरोसेच आहे असं म्हणावं लागेल.

 

कारण संपूर्ण उत्तर प्रदेश सोडाच मात्र उत्तर प्रदेश विधानसभेतच स्फोटकं सापडली आहेत.

 

12 जुलैला तपासादरम्यान पीईटीन स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली. उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं सापडल्यानंतर दिल्लीतील संसद परिसरासह लोकसभा, राज्यसभेतही चौकशी केली जात आहे.

 

खासदार बसतात त्या प्रत्येक सीटखाली तपासणी केली जात आहे.

 

सुरक्षा वाढवून सतर्कता बाळगण्याच्य दृष्टीने काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. अशा एकंदतरीत स्थितीत उत्तर प्रदेश विधानसभेत ही स्फोटकं पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पीईटीएन काय आहे?

 

– पीईटीएन अत्यंत धोकादायक स्फोटकं मानली जातात.

– ही गंधहीन स्फोटकं सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागणं अत्यंत कठीण असतं.

– किंबहुना, प्रशिक्षित कुत्र्यांनाही सापडत नाहीत.

– मेटल डिटेक्टरही या स्फोटकांना पकडू शकत नाही.

– कमी प्रमाणातील पीईटीएनचा स्फोट मात्र अत्यंत मोठा होतो.

– लष्कर आणि खाण उद्योगासाठी या स्फोटकांचा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *