Tue. Dec 7th, 2021

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केजरीवाल यांना सुनावले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी केलेलं ट्वीट आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झालं आहे. केजरीवाल यांनी सिंगापूरमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावर सिंगापूरच्या आरोग्य विभागाकडून आणि सिंगापूर दूतावासाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेली बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे मी हे स्पष्ट करतो की केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं मत देशाचं मत नाही’, अशा शब्दांत डॉ. एस.जयशंकर यांनी केजरीवाल यांना सुनावत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये सिंगापूर आणि भारत यांच्यात अतिशय चांगले संबंध आहेत. सिंगापूरकडून केल्या जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आणि इतर मदतीसाठी आम्ही आभारी आहोत. भारताच्या मदतीसाठी लष्करी विमान पाठवण्याच्या त्यांच्या कृतीतून हेच संबंध अधोरेखित होतात. मात्र, ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेली बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे मी हे स्पष्ट करतो की केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं मत देशाचं मत नाही’, असं जयशंकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *