Jaimaharashtra news

परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर यांच्यावर मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्या सोबतच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये डीसीपी अकबर पठाण यांचाही समावेश आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरणात पोलिसांचा समावेश असल्याचं समोर आल्यानंतर परमबीर सिंग यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणात सध्या देशमुख यांची ईडी व सीबीआय चौकशी सुरू आहे.

श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटला मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे.

Exit mobile version