पाण्याची भीषण टंचाई

यंदा तापमानात वाढ झाली असून नागरिकांच्या उन्हाच्या कडक झळा सोसाव्या लागत आहेत. कडक उन्हामुळे नागरिक थंड पाणी, पेय, आईस्क्रिम यांना जास्त पसंती देतात. तसेच पाणी हा सर्वांच्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहे आणि पाण्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. पाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी लागतं. पाणी बचाव अशा मोहिमादेखील राबण्यात आल्या. परंतु, अशातच पाणीटंचाई ही सामान्य नागरिकासाठी चिंतेचा विषया आहे. अनेक राज्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याचप्रामणे लोणावळाजवळील काही वाड्या वस्त्यांवर भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
मावळात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे येथील नदीनाले, धबधबे ओसंडून वाहत असतात, याच पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात मावळात येत असतात. परंतु पावसाळा आणि हिवाळा गेला की लोणावळ्या जवळील काही वाड्या वस्त्यांवर पाण्याची भीषणता दिसून येते, राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या उधेवाडी, फणसराई ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात विहीर आहे मात्र त्या विहिरिने तळ गाठलाय, तर ग्रामस्थ तांब्याने एक हंडा भरण्याचा प्रयत्न तासंन तास विहिरीत बसून करत असल्याचं विदारक चित्र सध्या फणसराई आदिवासी पाड्यावर दिसून येत आहे. या वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या पाणीटंचाईतून तेथील नागरिकांना वणवण फिरायला लागत आहे. तेथील नागरिकांनी ही पाणी टंचाई पीढ्या पीढ्या असल्याची माहिती दिला आहे. पाण्यासाठी डोंगर पार करून त्यांना एका गावातून दुसऱ्या गावात असं सात ते आठ किलोमीटर दूर जाऊन पाणी मिळवावं लागतं. त्यातही पाणी मिळेल याची शास्वती त्यांना नसते. त्यामुळे भारत जरी आझादीचा 75 वर्ष साजरा करत असला तरी देखील या गावामध्ये पाण्याची समस्या जटील झाल्याची पाहायला मिळत आहे. वणवण भटकावं लागतं या पाणीटंचाईतून नागरिकांची कधी सुटका होणार आणि पाणीटंचाई हा विषय कधी बंद होणार, सरकार अनेक राज्यातील पाणीटंचाई या विषयाकडे कधी गंभिरतेने लक्ष देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.