Tue. Sep 27th, 2022

लढाऊ एफ-16 विमानामुळे पाकिस्तान कोंडीत?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४१ जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतला आहे.

पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत बॉम्ब टाकून पलायन करत असतानाच भारताने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते.

पाकिस्तानचं कोणतंही लढाऊ विमानं भारताने पाडलं नसल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला.

पाकिस्तानने ते मान्य केल्यास पाकिस्तानचे अमेरिकेसोबत असणारे सबंध बिघडू शकतात.

नेमकं प्रकरण काय?

बुधवारी पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत बॉम्ब टाकून धूम ठोकत असताना भारताने पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं.

पाकिस्तानचं कोणतेही लढाऊ विमानं भारताने पाडलं नसल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला.

भारताने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडल्याचे पाकिस्तानने मान्य केल्यास पाकिस्तानला ते चांगलेच महागात पडणार आहे.

अमेरिकेने एफ-16 हे लढाऊ विमान पाकिस्तानला दिले होते.

मात्र विमान देताना एक करार करण्यात आला होता.

पाकिस्तानने या विमानाचा वापर कोणत्याही देशाच्या विरोधात करू नये असा करार करण्यात आला होता.

पाकिस्तानने एफ-16 विमानं त्याचं होत हे मानल्यास त्यांना अमेरिकेची नाराजगी पत्कारावी लागेल.

यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत बंद होऊ शकते.

पाकिस्तानचे आणि अमेरिकेचे संबध अगोदरच बिघडलेले असल्याने अमेरिकेकडून  मिळणारी मदत बंद होवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.