Friday, April 25, 2025 11:55:54 PM
20
राज्यसभा खासदार आणि माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'मी पंतप्रधानांना काही सूचना देऊ इच्छितो. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे'.
Friday, April 25 2025 08:39:57 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून 183 प्रवासी महाराष्ट्रात परतले आहे.
Friday, April 25 2025 07:57:19 PM
येस बँकचे संस्थापक असलेल्या राणा कपूर यांच्यावर 946 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होता. मात्र, सीबीआयला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.
Friday, April 25 2025 06:55:57 PM
मुंब्रा येथे समस्त मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड देखील या आंदोलनात उपस्थित होते.
Friday, April 25 2025 05:11:01 PM
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली आहे. त्यासोबतच, या बैलगाडा मालकांनी आपल्या जनावरांना मैदानात आणत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
Friday, April 25 2025 05:03:27 PM
नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात एका 17 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Friday, April 25 2025 03:03:42 PM
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत.
Friday, April 25 2025 02:52:34 PM
25 एप्रिल रोजी मुंबईतील वरळी येथील डोम, एनएससीआय येथे शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
Thursday, April 24 2025 09:13:07 PM
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले. ते 26 वर्षांचे होते. लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणातील कर्नालचे रहिवासी होते.
Thursday, April 24 2025 08:26:43 PM
देशाची राजधानी दिल्लीतील संसदेच्या अॅनेक्स इमारतीत विविध राजकीय नेत्यांची बैठक सुरू आहे. हा दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानची मोठी भूमिका असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.
Thursday, April 24 2025 07:16:24 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुखरूप परतलेल्या प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना धीर देऊन मुंबईकडे रवाना केले. सुखरूप परतलेल्या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
Thursday, April 24 2025 06:32:08 PM
गुरुवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी पोहोचले असून, सुरक्षा परिस्थितीच्या गांभीर्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
Thursday, April 24 2025 05:27:09 PM
लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना भेटण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन गेले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडिओ कॉलद्वारे जखमींची विचारपूस केली.
Thursday, April 24 2025 04:15:31 PM
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार राज्यातील मधुबनी येथे पोहोचले. 'दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल', अशी घोषणा मोदींनी केली.
Thursday, April 24 2025 02:52:23 PM
सर्वपक्षीय बैठकीत फक्त पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिल्यामुळे ओवैसींनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
Thursday, April 24 2025 02:40:02 PM
मृत हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांना अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार डोंबिवली येथे दाखल झाले होते.
Wednesday, April 23 2025 09:07:45 PM
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातील अलका चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले होते.
Wednesday, April 23 2025 06:58:01 PM
मंगळवारी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि त्यांची टीम श्रीनगरमध्ये दाखल झाली असून मृत पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी पोहोचली आहे.
Wednesday, April 23 2025 05:41:36 PM
पीडितांना भेटण्यासाठी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम येथे पोहोचले असून, या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना त्यांनी सांत्वन दिले.
Wednesday, April 23 2025 04:51:52 PM
मंगळवारी, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देशभ्रतार आणि वाघमारे हे दोन्ही कुटुंब घटना स्थळापासून थोड्याच अंतरावर होते. त्यानंतर, त्यांनी याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिली.
Wednesday, April 23 2025 03:19:08 PM
दिन
घन्टा
मिनेट