Tue. Jun 18th, 2019

मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी संकट?

35Shares

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तालावांमधील पाणीसाठा कमी होत चालल्याने मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी संकट येणार आहे.कारण सध्या 3,74,038 दशलक्ष लिटर इतकाच पाणी साठा उपलब्ध असल्याने हा पाणीसाठा पुढील 2 महिने पुरणार नाही. अशी अवस्था झाली आहे. मुंबईत दरवर्षी एप्रिल,मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या उदभवते मात्र यावर्षी ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी 2 महिने पुरेल की नाही याची शंका आहे.एप्रिलच्या सुरवाती पासूनच तलावातील पाणी पुरवठा कमी होत चालला असून सध्या केवळ 26 टक्के इतकच पाणी तलावांमध्ये उपलब्ध आहे.

सध्या तलावांमध्ये असलेल्या पाण्याची स्थिती

अप्पर वैतरणा  – 44568 दशलक्ष लीटर

मोडक सागर –  41255 दशलक्ष लीटर

तानसा –  43377 दशलक्ष लीटर

मध्य वैतरणा –  50708दशलक्ष लीटर

भातसा –  185247 दशलक्ष लीटर

विहार –  5561 दशलक्ष लीटर

तुसली –  3322 दशलक्ष लीटर

अजून किमान दोन ते अडीच महिने हा पाणी साठा मुंबईसाठी पुरवायचा आहे.गेल्या मान्सूनमध्ये तलावक्षेत्रात कमी पाऊस झाल्यानं उन्हाळ्यात मुंबईकरांना पाण्याची चणचण भासु शकते. हे जाणून यापूर्वीच महापालिकेने 10 % इतकी पाणी कपात आणि आणि 15 %  पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात  आहे.मात्र तरीही अजून त्रास संपलेला नसून पुढील दोन महिने मुंबईकरांना आणखी त्रास सहन करावा लागणार आहे.गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा हा सर्वात कमी आहे  2017–39.15%  इतका होता तर  2018–38.68%  आणि  2019– 25.84% एवढा आहे.

35Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *