फेसबूकने नाव बदललं; आता ‘मेटा’ नावाने रिब्रँडिंग

सोशल मिडीयावरील सर्वात लोकप्रिय माध्यम फेसबुकने वापरकर्त्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. फेसबुक माध्यमाने नावात बदल केला आहे. फेसबुक आता ‘मेटा’ या नव्याने रिब्रॅंडिंग झाले आहे. मेटा आता वास्तविक आणि आभासी जग एकत्र करणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रॅंड करण्याचा विचार करत होता. आणि अखेर फेसबुकने कंपनीच्या नावत बदल केला आहे. मात्र फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहे. कंपनी केवळ सोशल मिडीया कंपनीपासून मेटाव्हर्स कंपनी बनणार आहे. आणि एम्बेडेड इंटरनेट यावर काम करणार आहे. जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असे फेसबुकचे मुख्य अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.
सध्या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जगाच्या कनाकोपऱ्यात संवाद साधण्यासाठी माध्यमांचा वापर होतो. आणि आता ‘मेटा’ला इंटरनेट डेव्हलपमेंटचा पुढील टप्पा मानला जाईल. वापरकर्त्यांना आभासी जगातदेखील खऱ्या जगाचा भास ‘मेटा’द्वारे होणार आहे.
नवनवीन टेक्नोलॉजी आणि जगभरातील अनेक व्यवसायांमध्ये मेटावर्स वेगाने लोकप्रिय होत आहे. मेटावर्स हे व्हर्च्यूअल जग असून, वापरकर्ते इंटरनेटद्वारे ऍक्सेस करू शकतील.