फेक अकाऊंटद्वारे तरुणीचे अश्लील व्हिडिओ जमवणाऱ्या Facebook फ्रेंडला अटक!

तुम्ही फेसबुक वापरत असाल आणि करिअरच्या शोधात एखाद्या फेसबुक फ्रेंडच्या संपर्कात असाल तर सावधान… एका तरुणाने अँड्रू अँडरसन नावाने फेक अकाउंट बनवून नागपूरच्या एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं. ऑडिशनच्या नावावर पीडित तरुणीचे आपत्तीजनक व्हिडीओ मागवले आणि ते व्हिडिओ पुढे पॉर्न साईटवर अपलोड करण्याची भीती दाखवून खंडणी मागितली. गुन्ह्यासाठी आंतराष्ट्रीय सर्व्हरचा वापर करताना नागपूर पोलिसांनी मोठ्या शितापीने आरोपीला अटक केली.
या फेसबुकवरच्या अँड्रू अँडरसनचं खरं नाव फिरोज अन्सारी असं आहे.
नोकरी व्हिजावर कुवेतमध्ये तो राहतो.
पण भारतीय तरुणीला मात्र आपण स्वीडन येथे राहत आहोत, असं सांगितलं.
नोकरीचं आश्वासन देत सुरवातीला मुलीचे फोटो मागितले.
ऑडिशनच्या नावावर पीडित तरुणीचे आपत्तीजनक व्हिडीओ मागितले.
कालांतराने रोज दोन व्हिडीओ पाठवण्याची मागणी करू लागला.
व्हिडीओ पाठवले नाही तर ते व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करण्याची भीती दाखवून पाच लाखाची खंडणी मागितली.
गेल्या सहा महिन्यापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते.
आरोपी पीडित मुलीशी संवाद साधण्यासाठी अवैध टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सर्व्हरचा वापर करत होते.
त्यामुळे मुख्य आरोपीचा सुगावा लागत नव्हता.
मात्र नागपूर पोलिसांना अत्यंत अवघड असा तपास केला.
पॉर्न साईटवर व्हिडिओ अपलोड करतांना आरोपीने चूक केली.
त्यात त्याने एक असा व्हिडिओ आपल्या मित्राला पाठवला, जो आरोपीकडे नव्हता. तो देखील पॉर्नसाईटवर अपलोड झाला.
त्यामुळे तरुणीला संशय आला. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा मित्र अभय कुमार याला अटक केली.
त्यांनतर वेगवेगळ्या एजन्सींच्या संपर्कात राहून आरोपी फिरोज अन्सारी दिल्ली विमानतळावर उतारतातच इमिग्रेशनच्या मदतीने त्याला अटक करण्यात आलं.
यासाठी नागपूर पोलिसांना आठ राज्यांत तपास करावा लागला. चार हजार किलोमीटर प्रवास केला. त्यामुळे नागपूर पोलीसांवर कौतुकाची थाप पडत आहे. मात्र या घटनेनंतर Facebook Friends निवडतानादेखील सावध राहण्याची गरज असल्याचं पुन्हा दिसून आलंय.