Wed. Jun 19th, 2019

फेसबुक फ्रेंडने भेटल्यावर केला बलात्कार!

0Shares

फेसबुकवर मैत्री करताना अनोळखी लोकांशी जास्त संबंध वाढवू नयेत, असं नेहमी सांगितलं जातं. पण हे न ऐकल्याचे परिणाम एका मुलीला भोगावे लागल्याची घटना पुढे आली आहे. 22 वर्षीय आकाश टाले या आरोपीला फेसबुक फ्रेंडवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलंय. आकाश याने एका मुलीशी फेसबुकवर मैत्री करून तिला भेटायला बोलावलं आणि पहिल्या भेटीत तिच्यावर बलात्कार केला.

काय घडलं नेमकं?

आकाश टाले या तरुणाने आपल्याच शहरातील एका मुलीला फोसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली.

तिच्याशी मैत्री झाल्यावर त्याने तिच्याशी चॅटिंग सुरू केलं.

त्या मुलीनेही मैत्री झाल्यावर आपला मोबाईल नंबर त्याला दिला.

यानंतर दोघांनी एकमेकांना प्रत्यक्षात पाहिलं नसल्यामुळे भेटायचं ठरवलं

मुलगी आकाशला भेटायला तयार झाली.

मात्र पहिल्या भेटीत आपल्याबरोबर काय होईल याबद्दल मुलीने स्वप्नातही विचार केला नव्हता.

आकाश याने पहिल्याच भेटीत या मुलीवर बलात्कार केला.

त्यानंतरही अनेकदा तिला बोलावून तिच्यावर बलात्कार करत राहिला.

आकाशसोबत असणाऱ्या संबंधांबद्दल पीडित मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळाली.

मात्र त्यावर आपण लग्न करणार असल्याचं मुलीने म्हटलं.

मुलगी जेव्हा लग्नासाठी विचारू लागली, तेव्हा आकाशने तिला भेटणं बंद केलं.

तेव्हा आकाशने प्रेमाच्या नावाखाली आपली फसवणूक केल्याचं मुलीच्या लक्षात आलं.

त्यानंतर या मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. मानकापूर पोलिसांनी आकाश टाले याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: