Sun. Aug 25th, 2019

जगभरात Facebook, Instagramची सेवा विस्कळीत

13Shares

Googleच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचण आल्याचा प्रकार ताजा असतानाच रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील युजर्सनाही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला.

फेसबुकवर “Down for required maintenance” असा संदेश झळकत असून इन्स्टाग्राम युजर्सनाही अशाच अडचणीचा सामना करावा लागत आहे.

गुरुवारी सकाळी देखील अनेक युजर्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली आहे.

इतके तास फेसबुकवर तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याची ही पहिलीच वेळ असावी.

बुधवारी रात्री भारतासह जगभरातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना पोस्ट करताना आणि अकाऊंट लॉग इन करताना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला.

फेसबुकवर लॉग इन करता येत नसून फेसबुककडून दिलगिरी व्यक्त करणारा संदेश स्क्रीनवर झळकत आहे.

“फेसबुक सध्या देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी बंद असून लवकरच सेवा पूर्ववत होईल.  तुम्ही दाखवलेल्या संयमासाठी धन्यवाद”, असं यामध्ये म्हटलं आहे.

 

काही जणांच्या मोबाईल अॅपवर फेसबुक सुरू असले तरी फोटो किंवा मजकूर अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत हीच परिस्थिती होती.

दरम्यान, बुधवारी सकाळी गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम झाला होता.

या सेवा पूर्ववत होऊन काही तासांचा अवधी झाला असतानाच फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झाल्याने बुधवारचा दिवस युजर्ससाठी त्रासदायक ठरला.

13Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *