Mon. Jul 4th, 2022

महाजनांवर पोस्ट शेअर केल्याने महिला आक्रमक, 5 तास पोलीसांच्या गाडीचा केला पाठलाग

गिरीश महाजन यांच्या विरुद्ध फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी जळगावातील संतप्त महिलांनी संशयितांच्या तोंडाला काळे फासले आहे. यासाठी या महिलांनी चक्क 5 तास त्या पोलीसांच्या गाडीचा पाठलाग केला आहे. विजय अल्काबाई ताठे,महेश भगवान,राहुल गायकवाड, आणि निखिल ढाके या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या महिलांनी संशयितांच्या तोंडाला काळ फासण्यासाठी पोलीसांच्या नाकीनऊ आणले होते.

नेमकं प्रकरण काय?

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाने बदनामीकारक फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या महिलेसह तिघांना पोलीसांना अटक केली होती. विजय अल्काबाई ताठे, महेश भगवान, राहुल गायकवाड आणि निखिल ढाके या चौघांविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राहुल कारभारी गायकवाड, आणि निखिल ढाके दोघांना ताब्यात घेतले.त्यांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले.

आज जळगावातील संतप्त महिलांनी या संशयितांच्या तोंडाला काळे फासून त्यांना बेदम मारहाण करण्याच्या प्रयत्न केला. यासाठी पाच तास पोलिसांच्या ताब्यातील संशयितांचा पाठलाग केलेला आहे.

मात्र हे पाच तास सतत पाठपुरावा घेऊन सुद्धा पोलिसांनी संशयीतांच्या बचावा खातर शहरात अनेक ठिकाणी हलवले. सुरुवातीला या संशयितांना कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळेस देखील या महिला कोर्टाच्या आवाराबाहेर दबा धरून बसलेल्या होत्या.

त्यानंतर पोलिसांनी लपत-छपत आरोपींना जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये आणले त्या ठिकाणी देखील या महिलांनी संशयितांना आपल्या ताब्यात द्या यासाठी ठिय्या आंदोलन केले तर पोलिसांची आणि महिलांची धक्काबुक्की झाली.

या प्रकरणांमध्ये महिला पोलीस पथक पाचारण करण्यात आले होते तब्बल दोन तास हा ठिय्या सुरू होता मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या दाराने संशयितांची रवानगी कारागृहात केलेली आहे.

मात्र संतापलेल्या महिलांचे उग्र रूप पाहून संतप्त महिलांना रोखण्यासाठी पोलिसांना महिला पोलिस पथक सुद्धा पाचारण करावे लागले, या संशयितांना आमच्यासमोर हजर करा त्यांना माफी मागायला लावा ,पाया पडायला लावा अशी मागणी या महिलांकडून होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.