आता बाजारात Facebook, Twitter, Whatsapp, Google चे गहू!

‘एक पोतं फेसबुक दे’, ‘एक पोते व्हाटसअप दे’, ‘एक पोतं ट्विटर दे’ असं जर धान्य विकणाऱ्या दुकानदाराने आपल्याकडील माणसाला म्हटलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण असे बोल सध्या सोलापूरच्या मार्केट यार्डात ऐकू येऊ लागले आहेत. एकीकडे महिलांना सतत फेसबुक, Whatsapp च्या बाहेर या असं घरच्यांना म्हणावं लागतंय. मात्र आता या महिलांच्या किचनमध्येच सोशल मीडियाच्या ब्रँड्सने स्वयंपाकघरात ठाण मांडलंय.
शरबती गहू, बन्सी गहू, राधिका गहू अशा गव्हाची अनेक नावं तुम्ही आजवर ऐकली असतील.
फार तर एखाद्या छोट्या मुलीचं किंवा देव-देवतांचं नाव धान्याला दिलं जायचं.
मात्र गव्हाची पारंपरिक नावं मागे टाकत सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बाजूला सोशल मीडियाची ब्रँडनेम असणाऱ्या Google, Facebook, Whatsapp आणि Twitter अशा विविध नावांचे गहू सध्या बाजारात मोठ्या जोमात विकले जातायेत .
सोशल मीडिया आता सगळ्यांच्याच रोजच्या जगण्याचा भाग बनला आहे. Google, Twitter, Facebook या ने केवळ लोकांच्या मनात घर केलंय. त्यामुळेच ट्विटर, फेसबुक आणि गुगल या सोशल नेटवर्किंगच्या नावाने गव्हाचा ब्रँड तयार करण्यात आलाय.
हे सोशल मीडिया ब्रँडचे गहू मध्य प्रदेशातील रतलाम येथून येतात.
याला ग्राहकांची पसंतीही मोठ्या प्रमाणावर मिळतेय.
सोलापूरच्या मार्केट यार्डात या ब्रँडचा खप चांगलाच वाढलाय.
याला सोलापुरातच नाही तर कर्नाटकातही चांगली मागणी आहे.
केवळ Brand name बदलल्याने गेल्या वर्षभरापासून Google, Whatsapp, Facebook आणि Twitter या गव्हाला महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचं दिसून येतंय.