Tue. Mar 31st, 2020

जगभरात 40 कोटी फेसबुक युझर्सची माहिती लिक

सोशल मीडिया हा आता सध्या लोकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग म्हणजे आहे. परंतु सोशल मीडियामुळे अनेक लोकांची माहिती अनेकदा लिक झाली आहे.

सोशल मीडिया हा आता सध्या लोकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग म्हणजे आहे. परंतु सोशल मीडियामुळे अनेक लोकांची माहिती अनेकदा लिक झाली आहे. अशा घटना आपण अनेकदा पाहिल्या आहेत. अशीच घटना पुन्हा एकदा घडली आहे. जगभरातील 40 कोटी फेसबुक वापरणाऱ्यांचे मोबाईल नंबर आणि इतर माहिती लीक झाल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की प्रकरण काय ?

जगभरातील 40 कोटी फेसबुक वापरणाऱ्यांचे मोबाईल नंबर आणि इतर माहिती लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांचा मोठा फटका अमेरिका, वियतनाम, ब्रिटन या देशातील फेसबुक युजर्सला बसला आहे.
फोन नंबरसोबत युजर्सचे लोकेशन आणि जेंडरसदर्भातील माहितीसुद्धा लिक झाली आहे.

न्यूज वेबसाइट टेक क्रचमुळे ही माहिती बाहेर आली आहे. अमेरिकेत 13.3 कोटी, वियतनामचे 5 कोटी आणि इंग्लडचे 1.8 कोटी फेसबुक युजर्सची माहिती लिक झाली आहे. फेसबुकच्या सर्वरचा पासवर्ड सुरक्षीत नसल्याने डाटाबेसचा एक्सेस मिळाला, त्याद्वारे माहिती लिक करण्यात आल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

फेसबुकने दूसरिकडे 41.9 कोटी युसर्जपैकी केवळ 20 कोटी युजर्सचा डाटा लिक झाल्याचं मान्य केले आहे. यापुर्वीही फेसबुक, गूगल, एप्पलसारख्या बड्या टेक कंपन्यांकडून ग्राहकांची माहिती लिक होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
गूगल, फेसबुकवर आर्थिक दंड लावण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *