सतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट करणे आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणे यावरून आपल्या आवडीनिवडी आणि स्वभाव कळतो.
पण, सतत पोस्ट अपडेट करणे व पोस्ट लाईक करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अभ्यासात समोर आला आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठानं सरासरी 48 वर्षांच्या 5 हजार 200 लोकांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष मांडला आहे.
या संशोधनात सहभागींनी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं मापन 1 ते 4 मध्ये नोंदवले.
तर, लाईफ सॅटिस्फॅक्शन 1 ते 10 मध्ये नोंदवलं.