Sat. Jul 31st, 2021

फडणवीस- अजित पवार एकत्र!… बॅनरवरील भाजप नेत्यांच्या रांगेत अजित पवार कसे काय?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजितदादा पुन्हा एकदा भाजपच्या बॅनरवर झळकले आहेत. कल्याणमध्ये लागलेल्या या बॅनरने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

कल्याणमध्ये सध्या ‘देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा’ सुरू आहे.

या स्पर्धेला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते.

त्यासाठी लावलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस, भाजपवासी झालेले गणेश नाईक आणि स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या फोटोंच्या सोबतच अजितदादांचाही (Ajit Pawar) फोटो लावण्यात आला होता.

यामुळे साहजिकच कल्याणकरांच्या भुवया उंचावल्या आणि या बॅनरची चर्चा सुरू झाली.

मात्र अजित पवार हे कबड्डी (Kabaddi) असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असल्यानं त्यांचा फोटो लावल्याचं स्पर्धेचे आयोजक स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं आणि चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

मात्र भाजप कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणींना या बॅनरमुळे उजाळा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *