मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर फडणवीस आणि राज

थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीत शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे असणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या सभेत शिवसेनेकडून मुंबईत विकासकामे रखडली असल्याचे सांगितले होते. तसेच तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अशी टीकाही फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली होती. त्यामुळे फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेत उत्तर देणार आहेत.
तसेच, शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समाचार घेण्याची तयारी केली आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वाला आव्हान मिळालं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या आव्हानाला शिवसेना पक्षप्रमुख उत्तर देणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच वेळोवेळी भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेने राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यामुळे उद्धव ठाकरे राज यांना नेमकं कसे उत्तर देणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने वेळोवेळी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. या सर्व गोष्टींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. तसेच अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावरही मुख्यमंत्री भाष्य करणार आहेत.