मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर फडणवीस नाराज

विधानसभेत आजही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप झाले. या दरम्यान आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. त्यांच्या या निर्णयावर विरोधी पक्षात नाराजी दिसून आली. या पाश्वभुमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले.
काय म्हणाले फडणवीस ?
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे वचन शेतकऱ्यांना दिले होते. मात्र आता त्यांनी २ लाख कर्जमाफीची घोषणा केली.
याची अमंलबजावणीही मार्च पासून होणार असे सांगितले.
फक्त २ लाखांचे कर्जमाफ करुन शेतकरी चिंतामुक्त होणार आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे.
तसेच या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. असा आरोप फडणवीस यांनी केला.
याबरोबरच या घोषणेचा फायदा किती शेतकऱ्यांना होणार? याबद्दलही शंका उपस्थित केली.
३० सप्टेंबर नंतरच्या ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रावरील कर्ज वाढले आहे.
आता या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळणार नाही. मात्र आम्ही सभागृहात हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना पुन्हा कर्ज मिळावे, यासाठी त्यांच्या कर्जाचे पुर्नगठन केले जाणार. असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
यानंतर आम्ही सुरू केलेल्या योजनाच त्यांनी पुन्हा सांगितल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.