Mon. Jan 24th, 2022

बांगड्यांसंबंधीच्या विधानावरुन फडणवीसांनी माफी मागावी- आदित्य ठाकरे

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या बांगड्यांच्या विधानावरुन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावरुन माफी मागावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

देवेंद्र फडणवीसजी, मी साधारणपणे लवकर प्रत्युत्तर देत नाही. तुम्ही केलेल्या बांगड्यांच्या विधानावरुन माफी मागावी.

शक्तिशाली महिलांनी बांगड्या घातलेल्या आहेत. राजकारण सुरुच राहील, पण आपल्याला हा दृष्टिकोन बदलायला हवा.

निदान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

निंदणीय अशा प्रकारचं भाषण आहे. वारीस पठाण यांनी हे लक्षात ठेवायला हवं.

या देशात १०० कोटी पेक्षा अधिक हिंदु असल्यामुळेच कोणालाही बोलण्याचं अधिकार आहे.

अशाप्रकारे मुस्लिम राष्ट्रात अशा प्रकारचं विधान केलं असतं, तर त्या ठिकाणी काय अवस्था झाली असती, हे त्यांनी लक्षात घ्यायला हंव.

मात्र भारत हा सहिष्णू देश आहे. हिंदु समाज सहिष्णु आहे.

पण हिुंदु समाजाच्या सहिष्णुतेला कोणी हिंदु समाजाची दुर्बळता समजत असेल, तर तो मुर्खपणा ठरेल.

शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, खरं म्हटलं तर बांगड्या घातल्या हा शब्द आमच्या महिला कार्यकर्त्यांना आवडत नाही.

आणि म्हणूनच मी तो वापरणार नाही. मात्र, शिवसेना मूग गिळून बसली असेल, तरी आम्ही मूग गिळून बसणार नाही. असं विधान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

वारीस पठाण याने केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना फडणवीस बोलत होते.

काय म्हणाले होते वारीस पठाण ?

१५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी आहोत. हे लक्षात ठेवा. असं आपत्तिजनक विधान वारीस पठाण यांनी केलं होतं.

दरम्यान या विधानामुळे वारीस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *