Fri. Sep 30th, 2022

‘ज्यांचे मंत्री तुरुंगात गेले त्यांनी फार बोलू नये’

आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावर विचारले असता फडणवीसांनी विरोधकांवर  पलटवार केला. ते म्हणाले, की ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरु असतील, अशा पक्षाने पहिल्यांदा स्वत:चा आरसा पाहावा आणि नंतर त्यांनी अशा प्रकारची टीका करावी, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय. संजय राठोड यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असं सांगत फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.

महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात  मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे. फडणवीस असेही म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. आता विस्तार झाला, सरकार पडेल अस काही लोक म्हणत होते,आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे. शिवाय काही ही प्रश्न उपस्थितीत झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.