Mon. Jul 22nd, 2019

‘प्यार के चक्कर में’ परीक्षेत नापास, आता ‘GF’ कडे फी चे पैसे मागतोय परत!

0Shares

प्रेमात सर्व काही हारून कफल्लक होणाऱ्यांची उदाहरणं काही थोडी नाहीत. बीडमध्ये मात्र एका प्रेमवेड्या विद्यार्थ्याने हद्दच गाठलीय. परीक्षेत नापास झाल्यावर त्यासाठी आपल्या Girlfriend ला जबाबदार धरून तिच्याकडे वर्षभराच्या फी चे पैसे परत मागितले. अखेर या प्रेमिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे हा प्रकार?

BMSS मध्ये शिकणारा एका विद्यार्थी वर्गातीलच एका मुलीच्या प्रेमात पडला.

तिच्याबरोबर हिंडणं फिरणं करताना त्याचं अभ्यासाकडे साफ दुर्लक्ष झालं.

त्यामुळे परीक्षेत तो नापास झाला.

नापास झाल्यावर मात्र तो गडबडून गेला.

आपल्या या नापास होण्याला गर्लफ्रेंडच जबाबदार धरून स्वतःच्या नापास होण्याचं खापर त्याने तिच्यावरच फोडलं.

एवढंच नव्हे, तर गर्लफ्रेंडमुळे नापास झाल्यामुळे तिच्याकडेच बुडालेल्या फीचे पैसे मागण्यासाठी तो तिच्या मागे लागला.

यासाठी तो तिला वाटेल तेव्हा कॉल करू लागला.

वारंवार मेसेज करू लागला.

एवढ्यावरच न थांबता पैसे न दिल्यास तिचे खासगी फोटो फेसबूकवर टाकण्याची धमकीही त्याने दिली,

अखेर या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: