Mon. Jul 26th, 2021

औरंगाबादमधील ‘ते’ दोन्ही प्रकार मॉब लिंचिंगचे नव्हतेच!

औरंगाबादमध्ये आठ दिवसात घडलेले दोन्ही प्रकार मॉबलिंचिंग नाहीत. दोन्ही घटनांचा तपास केल्यानंतर हे प्रकार रोडरेंज असल्याचे समोर आलंय. फिर्यादी आणि आरोपी यांचा कोणत्याही पक्ष राजकीय पक्षाशी संबंध नाहीय. एका घटनेत CCTV फुटेज मिळालंय. यावरून अनेक गोष्टींचा खुलासा झालाय. खुद्द फिर्यादीने आपल्याला ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितलेलं नव्हतं, असं स्पष्ट केलंय.

काय म्हणाला होता फिर्यादी?

18 जुलै मध्यरात्री इम्रान इस्माईल पटेल या तरुणाने आपल्याला अज्ञात व्यक्तींनी अडवून ‘जय श्रीराम’चा नारा द्यायला लावला असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

रविवारी रात्री सिडको पोलिस ठाण्यात शेख अमीर शेख अकबर यानेही फिर्यादीत असाच आरोप केला,

कारमधील तरुणांनी मला थांबवून ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगितलं.

आम्ही नकार दिल्यावर त्यांनी शिवीगाळ केली.

त्यामुळे आम्ही घाबरून ‘जय श्रीराम’ म्हणालो.

मात्र CCTV फुटेजमध्ये तपासलं असता कारमधील तरुणांशी जेमतेम 50 सेकंदाचंच बोलणं झाल्याचं दिसून आलं.

यावरून पोलिसांचा संशय बळावला.

त्यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता आपण केलेली तक्रार खोटी असल्याचं फिर्यादीने मान्य केलं.

आपण अशा प्रकारे तक्रार केल्यास कारमधील लोकांनाधडा शिकवता येईल आणि आपलंही नाव होईल, अशी फिर्यादीची कल्पना होती.

फिर्यादीला ज्या लोकांनी अशा प्रकारची तक्रार करायला सांगितलं, त्यांची चौकशी आता पोलीस करणार आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद यांनी त्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *