Fri. Jan 21st, 2022

खऱ्या पोलिसांकडून फसला भामट्या पोलिसांचा डाव

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

आजकाल पोलिसांचा वेश करुन लुटण्याची नवी कल्पना भामट्यांकडून अंमलात आणली जात आहे. कोल्हापुरात देखील अशीच एक घटना समोर आली आहे.

क्राईम ब्रँचचे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून तीन भामट्यांनी सराफ व्यावसायिकाला लुटले.

 

ग्रामीण गुन्हे शाखेच्या शोध पथकाने आरोपींचा आणि त्यांच्या कटाचा अवघ्या 24 तासांत छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींकडून 96 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या दुचाकी गाडीच्या नंबरवरून हा गुन्हा उघडकीस आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *