Thu. Apr 2nd, 2020

कर्जबाजारीपणामुळे अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात गुणोरे गावात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

नेमकं काय घडलं ?

अहमदनगमध्ये असलेले पारनेर तालुक्यातील गुणोरे गावात कुटुंबातील चार सदस्यांनी आत्महत्या केली.
बाबाजी विठ्ठल बडे असे व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे.
एक मुलगा आठवीत होता तर दुसरा दिव्यांग असल्याचे समजते आहे.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
संपूर्ण कुटुंबाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *