Tue. Oct 26th, 2021

जेव्हा मायक्रोव्हेवमध्ये पिझ्झासोबत सापही शिजून आला बाहेर

रात्रीच्या वेळी ओव्हनमध्ये पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवला असताना पिझ्झासोबत सापही शिजून बाहेर आल्याची धक्कादायक घटना उत्तर केरोलिनामध्ये घडली. ओव्हनमध्ये मृत साप आढळल्याने कुटुंबियांचा थरकाप उडाला.

कुटुंबातील सदस्य रॉबर्ट यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसदरम्यान मायक्रोव्हेवचा वापर केल्यानंतर त्यांनी पुन्हा बऱ्याच दिवसांत ओव्हन वापरला नव्हता.

जेव्हा पिझ्झा खाण्याच्या उद्देशाने त्यांनी पिझ्झा मायक्रोव्हेवमध्ये ठेवला, तेव्हा ओव्हनमधून धूर निघत होता.

ते पाहून रॉबर्ट यांनी घरातील इतर सदस्यांना ओव्हनपासून दूर राहण्यास सांगितलं.

मग त्यांनी स्वतः ओव्हन उघडला तेव्हा आतमध्ये पिझ्झाबरोबरच 18 इंच साप मृत अवस्थेत आढळला. हा साप मेलेला होता. भाजल्यामुळे तो खूप भीतीदायक दिसत होता.

हा साप पिझ्झा गरम करण्यापूर्वीच मेलेला होता की मायक्रोव्हेवच्या उष्णतेमुळे मेला हे समजलं नाही. पिझ्झा बेकिंगसाठी ओव्हन मध्ये ठेवताना आतमध्ये असे काही असेल याची कल्पना नव्हती.

जेव्हा ओव्हनमधून विचित्र वास आला तेव्हा आतमध्ये  पिझ्झा व्यतिरिक्त काहीतरी आहे हे लक्षात आलं, असं रॉबर्ट यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *