Sun. Oct 17th, 2021

अभिनेत्याची फेसबुक पोस्ट केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मृत्यू

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा (Rahul Vohra) याचं कोरोनामुळे रविवारी निधन झालं. मात्र मृत्यूपुर्वी राहुल याने फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला बघुन अनेकांच्या डोळ्याला पाणी येणार अशी पोस्ट राहुलने केली आहे. त्याने लिहलं मी पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हरलो आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने शनिवारीच फेसबुकवर पोस्ट केली होती आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो आयुष्याशी झुंजही हरला. दिग्दर्शक आणि थिएटर गुरु अरविंद गौड यांनी सोशल मीडियावरुन राहुलच्या निधनाचं वृत्त दिलं. राहुल व्होरा मूळ उत्तराखंडचा होता.

थिएटरमध्ये काम केल्यानंतर तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करू लागला होता. त्याने अनेक वेब सीरीजमध्येही काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला कोरोना संसर्ग झाला होता. 35 वर्षीय राहुल व्होरा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंजत होता. तो सातत्याने फेसबुकवरुन मदत मागत होता. मात्र वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याचं निधन झाल्याचं बोललं जात आहे. काय होती फेसबुक पोस्ट? ‘मलाही उपचार मिळाले असते, तर मीही वाचलो असतो’ असं लिहून राहुलने फेसबुकवर स्वतःचे डिटेल्स शेअर केले होते. ‘पुन्हा लवकरच जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता हिंमत हरलोय’ असं राहुलने फेसबुकवर लिहिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना त्याने टॅगही केलं होतं. “मला कोव्हिड संसर्ग होऊन चार दिवस झालेत, मी रुग्णालयात दाखल आहे, पण रिकव्हरी झालेली नाही. ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. कुठे ऑक्सिजन बेड मिळेल का?” अशी पोस्टही त्याने 4 मे रोजी केली होती. मात्र कोरोनाशी झुंज लढत राहुल हा हरला. राहुलच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहे पण तो कामयचं आपल्यामधून निधून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *