खासदार आणि अभिनेता रवी किशन यांना पितृशोक

भाजपचे खासदार आणि भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रवी किशन यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.

पंडित श्यमनारायण शुक्ला यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. याबाबतची माहिती रवी किशनने ट्विटद्वारे दिली आहे.

ट्विटमध्ये आपल्या आईवडिलांच्या सोबतचा एक फोटो रवी किशनने शेअर केला आहे.

पंडित श्यामनारायण शुक्ला यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. परंतु त्यांची वाराणसीत देह त्यागण्याची अंतिम इच्छा होती.

त्यांच्या इच्छेनुसार त्यांना 15 दिवसांपूर्वी वाराणसीत आणले होते.

प्रकृतीत सुधार होत नसल्याने रवी किशन यांच्या वडिलांनी वाराणसीत देह त्यागण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पंडित श्यामनारायण शुक्ला हे जौनपुर जिल्ह्यातील केराकत गावाचे रहिवाशी होते.

श्याम नारायण शुक्ल भगवान शंकराचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी वाराणसीत देह त्यागण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Exit mobile version