Thu. Aug 22nd, 2019

ओदिशाच्या पूर्व किनारपट्टीवर ‘फोनी’ चक्रीवादळ धडकलं!

0Shares

सर्वांत विध्वंसक मानलं जाणारं फनी वादळ ओदिशाच्या पूर्व किनारपट्टीवर येऊन धडकलंय. या वेळी या ‘फोनी’ वादळाचा चक्रीवादळाचा ताशी वेग 185 किमी इतका प्रचंड होता. मात्र त्यानंतर हा वेग वाढतच आहे. आता फोनी वादळाचा वेग ताशी 240 किलोमीटर इतका झालाय.

लाखो नागरिकांचं स्थलांतर

फोनी चक्रीवादळामुळे ओदिशाच्या पूर्व किनारपट्टीवर पावसाला सुरुवात झाली आहे.

पुरी किनारपट्टीवर अनेक झाडं कोसळली आहेत.

मात्र या वादळाच्या तडाख्यात मनुष्यहानी होऊ नये यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे.

समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

ओदिशातील 13 जिल्ह्यांमधील 10 गावांतील सुमारे साडे 11 लाख रहिवाशांना फोनीचा धोका असल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलंय.

मदतीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने 1998 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला.

ओदिशाप्रमाणेच आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील किनारी भागांनाही ‘फोनी’ चक्रीवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्वण्यात आला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *