आर्चीला बघण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर चाहत्यांची गर्दी

सैराट या चित्रपटातून झळकलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु बारावीची परीक्षा देत आहे. सोलापूरच्या टेंभुर्णी येथील जय तुळजाभवनी आश्रम शाळा या परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा देत आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर आर्चीला बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. तसेच या परीक्षा केंद्राने बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या इतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची मागणी शाळेच्या संस्थाचालकांनी केली. आर्ची परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. आर्चीने बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सैराट या गाजलेल्या चित्रपटातून आर्चीने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा आर्ची दहावीत होती.
दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.
आता आर्ची बहिःस्थ विध्यार्थी म्हणून बारावीची परीक्षा देत आहे.
मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांचे पेपर ती देणार असल्याचे सांगण्यात आले.
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणारी आर्ची मात्र आर्टसमधून परीक्षा देत आहे.
तिची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी सकाळपासून तिच्या परीक्षा केंद्राजवळ प्रचंड गर्दी केली आहे.
यापूर्वी तिने दहावीची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून दिली होती.