… अन् शेतातच अवतरले गणपती बाप्पा !
जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंबादमध्ये चक्क शेतातच गणपती बाप्पा अवतरले आहेत. दोन एकर शेतीवर हा गणेश अवतरला आहे.
शेतकऱ्यांना शेती विषयक संदेश देणाऱ्या संकल्पनेवर आधारित देखाव्याच्या माध्यामातून गणेशाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विलास कोर्डे यांच्या शेतात हा गणपती बाप्पाचा अनोखा असा भव्यदिव्य देखावा साकारण्यात आला आहे.
गहू, मका, ज्वारी, हरभरा ही धान्य कलात्मकरित्या वापरून गणेशाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
तब्बल दोन महिने आधी या गणेशाच्या निर्मितीसाठी सुरुवात करण्यात आली. दोन एकरवर साकारण्यात आलेला हा बाप्पा शेतकऱ्यांना
प्रेरणा देणारा आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश देत पाण्याचे योग्य नियोजन करून शेती करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
शेतातील अवजारे वापरून तयार केलेला या शेती बाप्पा सोबत 120 फुटांची महादेवाची पिंड देखील तयार करण्यात आली आहे.
तयार केलेल्या या ग्रीन गणेशामुळे खिर्डी परिसरात शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. ड्रोनच्या माध्यमातून या ग्रीन
गणेशाचे मोहक रूप कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.