Wed. Dec 8th, 2021

पुणतांब्यात शेतकऱ्यांचा निषेध, शेतकऱ्यांनी केली परिपत्रकाची होळी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

संपूर्ण महाराष्ट्राला शेतकरी संपाची हाक अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यातून देण्यात आली. शेतकरी संप तीव्र झाला असताना राज्य सरकारनं संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, काही दिवसातच भाजप सरकारनं घुमजाव करत 1 लाखपर्यंत कर्जमुक्ती करू असं सांगण्यात आले. त्यातही अन्यायकारक अटी लादून शेतकऱ्यांन अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारनं केला.

 

आता पुन्हा नवीन जी आर काढण्यात आला. त्यामुळे सरकट कर्जमाफी करण्याची मागणी शेतकरी करत पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या वतीनं निषेध करुन परिपत्रकाची होळी करण्यात आली. तर दुसरीकडे कोल्हापुरात शेतकरी संघटनेकडून परिपत्रकाची होळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी शेतकरी संघटनेनं केली. तसंच सरकारच्या जाचक अटीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *