Jaimaharashtra news

गरिब घरातून आलेल्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसह पूजेला बसण्याचा मान

जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा

 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील मेरत कुटुंबाला यंदाच्या शासकीय महापुजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.

 

परसराव मेरत आणि त्यांच्या पत्नी अनुसया यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची शासकीय पुजा केली.

 

गरिब घरातून आलेलं हे शेतकरी दाम्पत्य गेल्या 10 वर्षांपासून नित्यनेमानं वारी करत आहेत.

 

गेल्या तीन वर्षांपासून ते माऊलींच्या पालखीसह वारीत पायी सहभागी होत आहेत.

 

महापुजेनिमित्त त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसटी महामंडळातर्फे मानाच्या पुजेचा मान मिळणाऱ्या दाम्पत्याला विशेष पास देण्यात येतो.

Exit mobile version