Wed. Jun 19th, 2019

मुलीचे केले कन्यादान; शेतकरी बापाने दिले प्राण

0Shares

एकीकडे मुलीचे लग्न पार पाडले आणि दुसरीकडे वडिलांनी कन्यादान केल्यानंतर आत्महत्या केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शिरजगाव येथे घडली आहे. बंडू कांबळे असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्ज फेडू शकत नसल्यामुळे ही आत्महत्या केल्याचे समजते आहे. मंगळवारी रात्री राहत्या घरीच बंडू कांबळे यांनी आत्महत्या केली.

नेमकं काय घडलं ?

राज्यात शेतकरी कर्जबाजरीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे नेहमी समोर येते.

असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ येथील नेर तालुक्यातील शिरजगाव येथे घडली आहे.

बंडू कांबळे असे कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव असून ते 55 वर्षाचे होते.

बंडू कांबळे या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज घेतले होते.

मात्र नापिकीमुळे शेतकऱ्यावर कर्ज वाढत गेले.

त्यानंतर मुलीचे लग्न करण्यासाठीही त्यांनी लोकांकडून पैसे घेतले होते.

रविवार रोजी त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला.

मंगळवारी सत्यनारायणाची पूजा पार पडल्यानंतर मुलीला आणि जावयाला निरोप दिला.

रात्री सगळे झोपले असताना खोलीत गळफास घेऊन बंडू कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: