Wed. Jul 28th, 2021

चक्क शेतकऱ्याने पिकवली अफुची शेती, पोलिसांना कळताच झाला फरार

जगात माणसं पैसे मिळवण्यासाठी कोणते काम करतील याचा अंदाज लावणे जरा कठीणच आहे. हिंगोलीतील एका शेतकऱ्यांने चक्क अफुची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यातील बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भुशी शिवारात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अफूची बाग फुलवली होती.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी धाड शेतात धाड टाकली. शेतकऱ्याचे नाव रामदास गणाजी खोकले असून यांच्या शेतामधून दोन गुंठ्यामधील जवळपास दीड हजार अफ्फुची झाडे पोलिसांना आढळून आली.

त्यानंतर पोलिसांनी झाडे तोडून पोलीस स्थानकात आणली आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा छापा पडल्याची माहिती मिळताच अफूची शेती पिकवणारा शेतकरी मात्र फरार झाला आहे. या घटनेचा बाळापुर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *