Mon. Jan 17th, 2022

बुलढाण्यातील शेतकऱ्याची भन्नाट युक्ती, मोटारसायकलमध्ये फवारणी यंत्र!

महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, ही निश्चितच दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र याच महाराष्ट्रात असेही काही शेतकरी आहे, जे आपल्या युक्तीच्या जोरावर शेतीचं काम जास्तीत जास्त फायदेशीररीत्या करण्यासाठी विविध प्रयोग करतात. या प्रयोगांचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होऊ शकतो. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील संदीप राऊत या शेतकऱ्यानेही एक आगळावेगळा प्रयोग केलाय. शेतात फवारणीसाठी त्याने आपल्याकडील मोटर सायकलवर फवारणी यंत्र तयार केलं आहे. त्या माध्यमातून राऊत एका दिवसाला तब्बल 10 ते 12 एकर शेतीची फवारणी करतो. त्यासाठी त्याला मजुरही कमी लागतात.

पूर्वी शेतात मजुरांना यंत्र पाठीवर घेऊन फवारणी करावी लागत असे.

त्यामध्ये दिवसाला फक्त 2 ते 4 एकर फवारणी होत असे.

त्यात विषबाधा होण्याची दाट शक्यता होती.

त्याला प्रतिबंध घालण्यासाठी संदीपने शक्कल लढवीत आपल्या मोटरसायकलचा वापर करत फवारणी यंत्र तयार केलं.

काय आहे हे यंत्र?

हे यंत्र तयार करण्यासाठी 16 होल्डच्या बॅटरीचा वापर करण्यात आला.

35 लिटरचा कॅन सहज यावर ठेवता येतो.

या यंत्राच्या 6 पम्पांमधून फवारणी होते.

शेतात पिकाची फवारणी करणं सोपं झालंय. या शेतकऱ्याने लढवलेल्या युक्तीची आता सर्वत्र स्तुती होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *