मराठवाडा, विदर्भापाठोपाठ नाशिकचे शेतकरी संपावर जाणार
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा सामूहिक निर्णय घेतल्यानंतर आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमधील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी कुठल्याही प्रकारचा शेतमाल बाजारपेठेत विकणार नाही. असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडचे शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार आहेत. याबाबत विशेष ग्रामसभेत एकमताने हा ठराव ग्रामस्थांनी पारित केला.