Sun. Jun 13th, 2021

भारत बंदनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली

भारत बंदनंतर देशात ठिकठिकाणी या आंदोलनाचे पडसाद उमटले…

The Union Home Minister, Shri Amit Shah chairing a meeting of all political parties in Delhi on the COVID-19 situation in the national capital, in New Delhi on June 15, 2020.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे शिवाय आज देशात ठिकठिकाणी आंदोलन झाले. सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांचा आरोप आहे. आज भारत बंदचा नारा दिला होता.

गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या अनेक चर्चा झाल्या मात्र यावर काही तोडगा निघाला नाही. आजच्या भारत बंदनंतर उद्या सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. त्यापूर्वीच अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी सर्वत्र चर्चा आता सुरू झाली आहे.

भारत बंदनंतर देशात ठिकठिकाणी या आंदोलनाचे पडसाद उमटले आहे. देशभरात भारत बंद पाळण्यात आल्यानंतर आता उद्या सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये काय ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, उद्याच्या बैठकीपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत तिन्ही कृषी विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

या चर्चेसंदर्भात भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी माहिती दिली आहे. या बैठकीत १३ सदस्य गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शिवाय या बैठकीत काय होणार याकडे शेकऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *