Fri. May 7th, 2021

कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी शहरातील मानवतजवळील केकरगावात  गळफास लावून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

हरीकिशन लाडाणे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

गुरूवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे.

हरीकिशन लाडाणे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सुमारे 1लाख 40 हजार रुपये कर्ज आहे.

त्या कर्जाची परतफेड करू शकत नसल्या कारणाने त्यांनी आत्महत्या केली.

हरीकिशन यांच्या पाठीमागे आई,पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

हरीकिशन परिवाराकडे केकरगावाजवळील शिवारात 3 एकर शेतजमीन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *