Sun. Oct 17th, 2021

इच्छा मरणाची परवानगी द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

 

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

जळगाव जिल्ह्यातील्या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी इच्छा मरणाची परवानगी द्यावी या मागणीसाठी तहसिल कार्यलयावर मोर्चा काढला.

 

गेल्या अनेक दिवसापासुन विजबील माफी, कर्जमाफी आणि ऊत्पादन खर्चावर आधारित मालाला भाव मिळावा अशी राज्यभरातील शेतकर्यांची मागणी आहे.मात्र या मागण्या मान्य होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीत सापडुन

आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करला आहे.

 

आत्महत्या करुन देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार गंभीरतेने पहात नसल्याचा आरोप करत सरकार चा निषेध करण्यासाठी शेतकरी कृती समिति ने चक्क ईच्छा मरणाची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *